Ad will apear here
Next
शांतीवनात फुलला टोमॅटोचा मळा
बीड : शांतीवन शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. मे महिन्यातील ४७ डिग्री तापमानात टोमॅटोची लागवड केली. इतक्या कठीण उष्णतेच्या तडाख्यात ती झाडे वाढवली म्हणून आज दोन एकर टोमॅटोचा मळा शांतीवन मध्ये फुलला आहे. सुदैवाने आज ७० रुपये किलो टोमॅटोचा भाव असून भाव असेच टिकले, तर यातून २० लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. असे घडले तर यावर्षी शांतीवन मधील ३०० लेकरांच्या भाकरीसाठी लागणारी गरज भरून काढण्यासाठी खूप मोठी मदत होईल, अशी माहिती दीपक नागरगोजे यांनी दिली.

श्रध्येय बाबा आमटे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार शांतीवनची वाटचाल हळू हळू स्वावलंबनाकडे चालू आहे. केवळ देणगीवर संस्था उभी राहू शकत नाही. तर आपल्या कष्टातून निघणाऱ्या उत्पन्नाचा आधार मिळाला तरच सामाजीक संस्था चालू शकतात. अन्यथा ते काम फार काळ टिकणार नाही; म्हणून स्वावलंबी होणे गरजेचे आहे, असे बाबा म्हणायचे. म्हणूनच त्यांच्या या संकल्पनेतून आनंदवन ही जगातील सर्वात मोठी महारोग्यांची वसाहत स्वावलंबी बनू शकली. पुढे डॉ विकास आमटे यांनी वेगवेगळे १३० उद्योग आनंदवनात उभे केले आणि आनंदवन हे पुनर्वसन प्रकल्पाबरोबरच एक मोठे उद्योग केंद्र बनू शकले .

बाबांच्या याच विचारांचा आदर्श घेत आदरणीय डॉ विकास आमटे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या शेती आणि जलसिंचनच्या कामाची प्रेरणा घेऊन शांतीवन शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. जिथे दिवाळी नंतर चिमणीला पिण्यास पाणी नसायचे अश्या दुष्काळ ग्रस्त प्रदेशात शांतीवनने पाण्याचे मोठे स्रोत निर्माण केले आहेत. केवळ आपलीच नव्हे तर शेतकऱ्यांची २०० एकर जमीन बारमाही ओलिताखाली आणली आहे. सोमनाथ प्रकल्पाच्या धर्तीवर आता शेतीत वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत. कडाक्याच्या उन्हाळ्यातही १० एकर जागेवरती शांतीवनने टरबूज आणि खरबूजचे पीक उत्तम काढले.

टोमॅटो विक्री सुरु करत आहोत. ‘यासाठी प्रेरणा ज्यांनी डॉ विकास आमटे आणि बळ शशिकांत चितळे आणि श्री सुरेश जोशी यांनी दिले, तर वीणा गोखले यांच्या 'देणे समाजाचे ' या चळवळीने या स्वप्नांपर्यंत पोहोचवले,’ अशी भावना नागरगोजे यांनी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZMGBF
Similar Posts
वंचितांचे माहेर... शांतिवन ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी दीपक आणि कावेरी नागरगोजे या दाम्पत्याने बीडमध्ये शांतिवन प्रकल्पाची सुरुवात केली. अन्य गरजू मुलांनाही नंतर त्यात सामावून घेण्यात आले आणि आणखीही वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आले. वंचितांचे जणू माहेरच बनलेल्या ‘शांतिवन’विषयी जाणून घेऊ या ‘लेणे समाजाचे’ या सदरात
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण परळी   (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.  या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या
श्री माऊली हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा बीड : येथील श्री माऊली हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन श्री माऊली हॉस्पिटलतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब जनतेसाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली
पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश बीड : बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला होता. यामुळे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुलाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language